जी २० च्या पहिल्या विकास कार्यगटाची होणार मुंबईत बैठक

बैठकीच्या तयारीला सुरुवात

जी २० च्या पहिल्या विकास कार्यगटाची होणार मुंबईत बैठक

भारत आपल्या जी २० अध्यक्षतेखाली भारत या बैठकीची तयारी करत आहे. ज्यामध्ये अनेक विकसनशील देशांचा समावेश केला जाईल. १३ते १६ डिसेंबर या कालावधीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे जी २० च्या विकास कार्य गटाची पहिली बैठक होता आहे.

या बैठकीत भारताकडून संबंधित मुद्द्यांवर विकसनशील देशांची भूमिका वाढवण्यावर भर देण्यात येईल. जी २० मध्ये विकसनशील देशांचा आवाज उठवण्‍याच्‍या निश्‍चयाच्‍या अनुषंगाने डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्‍या चर्चेमध्‍ये भारत ग्‍लोबल साउथसाठी मोठी भूमिका बजावेल.

त्याच वेळी, भारताच्या जी २० अध्यक्षांच्या अंतर्गत आर्थिक आणि सेंट्रल बँकेच्या उप प्रमुखांची पहिली बैठक मंगळवारपासून कर्नाटकातील बेंगळुरू येथे सुरू होणार आहे. ही तीन दिवसीय बैठक फायनान्स ट्रॅक अजेंडावर चर्चेला सुरुवात करेल. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक होणार आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,हे जागतिक आर्थिक चर्चा आणि धोरण समन्वयासाठी एक प्रभावी व्यासपीठ प्रदान करेल.

हे ही वाचा :  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

नवीन वर्षात २३-२५ ​​फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची पहिली बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वित्त आणि मध्यवर्ती बँकेच्या उपप्रमुखांच्या आगामी बैठकीचे सह-अध्यक्ष अजय सेठ, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मायकल डी. पात्रा हे असतील. भारतानेजी २० सदस्य राष्ट्रे आणि इतर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या त्यांच्या समकक्षांना या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Exit mobile version