क्रिप्टो जगतातील बिनयान्स कंपनीमार्फत दहशतवादी संघटनांना वित्त पुरवठा

कंपनीचे सीईओ चांगपेंग झाओ सीईओ पदावरून पायउतार

क्रिप्टो जगतातील बिनयान्स कंपनीमार्फत दहशतवादी संघटनांना वित्त पुरवठा

क्रिप्टो जगतात बिनयान्स (Binance) ही एक मोठी कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख चांगपेंग झाओ यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीमार्फत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना मोठा वित्त पुरवठा झाल्याचे समोर आले आहे. या माहितीनंतर क्रिप्टो बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

बिनयान्स कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आल्यावर कंपनीचे सीईओ चांगपेंग झाओ यांनी तातडीने सीईओ पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी आपण राजीनाम देत असल्याचे त्यांनी जगजाहीर केले. अमेरिकेच्या मनी लॉड्रिंग, आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित कायद्यान्वये चौकशीचा ससेमिरा बिनयान्स कंपनीच्या पाठीमागे लागला आहे.

झाओ यांनी एक्सवर (ट्वीटर) एक पोस्ट शेअर केली आहे. सीईओ पदावरुन पायउतार होत असल्याचे त्यांनी जाह्रीर केले आहे. हा भावनिक क्षण असून सध्याच्या घडीला हीच एक चांगली कृती असू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. माझ्याकडून चूक झाली आणि त्याची जबाबदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. बिनयान्स या संस्थेला अजून मोठी भरभराट पहायची असून प्रगती साधायची आहे. मैलाचा दगड रोवायचा आहे, अशा भावना त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. सध्या झाओ यांच्या जागेवर रिचर्ड टेन्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

नवाझ शरीफ यांच्यासारखे परदेशात पलायन करण्याचा इमरान खान यांचा मनोदय

बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेचा मार्ग केवळ सहा मीटर दूर

येमेनमध्ये भारतीय मुलीला मृत्युदंडाची शिक्षा

आयसीसीकडून बंदी; ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू मॅकगेहे यांची निवृत्ती!

बिनयान्स या कंपनीने अमेरिकेतील आर्थिक गैरव्यवहारासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. हमास, अल कायदा, इसीस अशा दहशतवादी संस्थांना क्रिप्टो करन्सीमार्फत रसद पुरविण्यात येत असल्याचा आरोप गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होता. हमास-इस्त्राईल यांच्या युद्धानंतर या प्रकरणात अमेरिकेने लक्ष घातले. त्यावेळी या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बिनयान्स कंपनीमार्फत करण्यात आलेले १ लाख व्यवहार चौकशी संस्थांच्या रडारवर आले आहेत.

Exit mobile version