भारतातील बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने एक महत्वाची नियमावली आता लागू होणार आहे. आता कुठल्याही बँक खाते धारकाच्या परवानगी शिवाय त्याच्या खात्यातून पैसे कमी होणार नाहीयेत. उद्यापासून म्हणजेच शुक्रवार, १ ऑक्टोबरपासून देशात ऑटो डेबिटचे नवे नियम लागू होत आहेत. भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार हे नवे नियम लागू होणार आहेत. त्यानुसार तुमच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम ही ऑटो डेबिट होणार नाही.
एक ऑक्टोबरपासून रिझर्व बँकेने ॲडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे. त्यामुळे बँक खाते धारकांची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड युपीआय यांच्याशी निगडित असलेले ऑटो डेबिट आता बंद होणार आहे.
या आधी ग्राहकाच्या निर्देशानुसार विज बिल, पाणी बिल, ओटीटी सबस्क्रीप्शन, मोबाईल बिल अशा अनेक गोष्टींचे पैसे ग्राहकाच्या खात्यातून ऑटोमॅटिक भरले जात असत. पण आता ॲडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य झाल्यामुळे प्रत्येक बिल भरण्याच्या वेळी ग्राहकाला ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड टाकणे अनिवार्य असणार आहे. याला बँक कर्जाचा हप्ता, म्युचल फंड एसआयपी, इन्शुरन्स हप्ता असे अपवाद असणार आहेत.
हे ही वाचा:
लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!
मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….
अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?
भारतीय रिझर्व बँक ही नवी नियमावली २०२१ मधील नव्या अर्थ संकल्पीय वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२१ पासून लागू करणार होती. पण बँका आणि ग्राहक या दोन्ही पातळीवरून झालेल्या मागणीनुसार रिझर्व बँकेतर्फे अधिक सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. त्यामुळे ही नियमावली लागू होण्याची नवी तारीख १ ऑक्टोबर असणार आहे.