जागतिक बाजारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास कायम आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात २,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि व्याजदरांमुळे जगातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता असताना ही गुंतवणूक करण्यात आली आहे.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान भारतीय बाजारपेठेत २,४४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ७,६०० कोटी रुपयांची विक्री केली होती. ऑगस्ट महिन्यात भारतीय शेअर बाजारात ५१,२०० कोटी रुपये आणि जुलैमध्ये ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी केली होती. जुलैपूर्वी, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराची सलग नऊ महिने विक्री केली होती, जी गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झाली होती.
हे ही वाचा:
धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख
नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक
बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक
शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान
विदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय बाजारातून १.६६ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर ते या वर्षी जून या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली सततची विक्री. आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या एका आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी कर्ज बाजारातून २,९५०कोटी रुपये काढले आहेत. भारताबरोबरच तैवान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि थायलंडच्या बाजारातही परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.
सणासुदीच्या हंगामात ग्राहक खर्चात अपेक्षित वाढहोण्याच्या आशेने सप्टेंबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत शेअर बाजारात जवळपास ५,६०० कोटींची गुंतवणूक केली होती . त्याआधी ऑगस्टमध्ये आणि जुलैमध्ये जवळपास ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.