आर्थिक क्षेत्रात काहीशा नकारात्मक घडामोडी घडत आहे. या घडामोडींचा शेअर बाजारावर फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात घसघशीत गुंतवणूक केली आहे. मार्चमध्ये या गुंतवणूकदारांनी ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने कॅपिटल गुड्स क्षेत्राला जास्त पसंती दिली आहे. या गुंतवणुकीमध्ये जीक्यूजी पार्टनर्स या अमेरिकेच्या कंपनीने यामध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेली गुंतवणूक म्हणजे भांडवल बाजारात सकारात्मक वातावरण असल्याचे द्योतक आहे. परंतु अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक कोसळल्यानंतर विदेशी गुंतवणूकदार सावध दृष्टिकोन स्वीकारू शकतात असे मत भांडवल बाजारातील तज्ञांचे आहे.
शेअर बजाजराने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या या महिन्याच्या सुरुवातीपासून ते १७ मार्चच्या ट्रेडिंग सत्रापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ११,४९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याआधी परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये ५,२९४ कोटी रुपयांची आणि जानेवारीत २८,८५२ कोटी रुपयांची विक्री केली होती. डिसेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ११,११९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
हे ही वाचा:
‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी
ठाण्याची एकमेव धावपटू निधीसिंगला चेन्नईमध्ये यश
तुर्की-सीरियानंतर आता ६. ७ तीव्रतेच्या भूकंपाने इक्वेडोर हादरले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा
मार्चमधील आतापर्यंतच्या ट्रेडिंग सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू क्षेत्रात सतत खरेदी केली आहे. या गुंतवणूकदारांनी कर्ज बाजारातून २,५५० कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. विदेशी गुंतवणूकदार समभाग बाजारामध्ये सकारात्मक होते. पण कर्ज बाजारामध्ये निव्वळ विक्रेते राहिले. विदेशी गुंतवणूकदारांनी कर्ज बाजारात २,२५० कोटी रुपयांची विक्री केली आहे.