29 C
Mumbai
Sunday, January 12, 2025
घरअर्थजगतचौथ्यांदा जीएसटी संकलनाने चौथ्यांदा केला १. ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

चौथ्यांदा जीएसटी संकलनाने चौथ्यांदा केला १. ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

मार्च महिन्यात १,६०,१२२ कोटी रुपये जीएसटी संकलित

Google News Follow

Related

मार्च २०२३मध्ये एकत्रित जीएसटी महसूल संकलन १,६०,१२२ कोटी रुपये झाले आहे. आहे. यात सीजीएसटी २९,५४६ कोटी रुपये, एसजीएसटी ३७,३१४ कोटी रुपये, आयजीएसटी ८२,९०७ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या ४२,५०३ कोटींसह) आणि अधिभार १०,३५५ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या ९६० कोटी रुपयांसह) आहे. चालू आर्थिक वर्षात चौथ्यांदा जीएसटी संकलनाने १.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर जीएसटी लागू झाल्यापासून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन नोंदवले आहे. या महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक आयजीएसटी संकलन झाले आहे .

सरकारने आय जीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी ३३,४०८ कोटी रुपये सीजीएसटी आणि २८,१८७ कोटी रुपये एसजीएसटी ची थकबाकी दिली आहे. मार्च २०२३मध्ये नियमित थकबाकी नंतर केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल,सीजीएसटीसाठी ६२,९५४ कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी ६५,५०१ कोटी रुपये इतका आहे.

मार्च २०२३मध्ये जीएसटीपोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा १३% जास्त आहे. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयातीद्वारे जमा झालेला महसूल १४% जास्त आहे.मार्च २०२३ मधे आतापर्यंतचे सर्वाधिक परतावे दाखल झाले आहेत. मागच्या वर्षीच्या याच महिन्यात अनुक्रमे ८३.१% आणि ८४. ७ % च्या तुलनेत मार्च २०२३ पर्यंत इनव्हॉइसचे ९३.२% विवरण आणि ९१.४ % परतावे दाखल झाले.

हे ही वाचा:

संजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका…

प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे कालवश

अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानीचा जामीन नाकारला

सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

एकूण सकल संकलन २०२२-२३ या वर्षासाठी १८.१० लाख कोटी रुपये आहे. तर संपूर्ण वर्षासाठी सरासरी सकल मासिक संकलन १.५१ लाख कोटी रुपये आहे. २०२२-२३मध्ये एकूण महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ % जास्त होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे १.५१ लाख कोटी रुपये, १. ४६ लाख कोटी रुपये आणि १. ४९ लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत १.५५ लाख कोटी रुपये आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा