भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ झाल्याने भारताने रशियाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. भारताच्या परकीय चलनाचा साठा $५८०.३ बिलियन डॉलर इतका झाला आहे.
मोदी सरकारने आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने दमदार पावले टाकत आयात कमी करायचा प्रयत्न करायला घेतला आहे. त्यासाठी देशांतर्गत उत्पादनाला चालना देणाऱ्या योजना सरकार आखत आहे. त्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होत आहे.
भारत आणि रशिया दोन्ही देशांच्या परकीय चलनसाठ्यातील वाढ काही काळासाठी मंदावली होती. मात्र रशियाच्या साठ्यात वेगाने घट झाल्याने भारताने रशियाला पाठी टाकले आहे.
हे ही वाचा:
‘या’ सहा बँकांचे खासगीकरण तूर्तास नाही
नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय
उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकाकडून खंडणीखोरी?
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार ५ मार्च रोजी भारताच्या चलनसाठ्यात $५८०.३ बिलियन डॉलर जमा झाल्याने रशियाच्या $५८०.१ बिलियन डॉलरच्या साठ्याला मागे टाकले.
सर्वात जास्त परकिय चलनाचा साठा असलेल्या देशांमध्ये चीनचा, जपान आणि स्वित्झरलँड या देशांचा समावेश आहे. चीनचा यात सर्वात वरचा क्रमांक आहे. चीनकडे $१३,२८७ मिलीयन इतका प्रचंड परकीय चलनाचा साठा आहे. त्याबरोबरच जपान ($१२,६४६ मिलियन) आणि स्वित्झरलँड ($४,६२७ मिलियन) या देशांचा समावेश होतो.
भारतीय परकीय गंगाजळी आता एकूण १८ महिन्यांच्या आयातीसाठी पुरणारी आहे. एका अहवालानुसार भारतीय रुपया २०२१ मध्ये भारतीय रुपया वधारला आहे.