“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

विकसित भारतासाठी चार बाबींवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण हे बजेट संसदेत मांडत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प युवा आणि महिला यांच्यावर केंद्रित असणार याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवार, ३१ जानेवारी रोजी झालेल्या प्रेस ब्रीफिंगवरून आली होती. त्यावरून अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्पात कोणत्या चार मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे हे सांगितले.

विकसित भारतासाठी चार बाबींवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं निर्मला सितारमण म्हणाल्या. आपल्याला गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता या चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं. या चार वर्गाच्या इच्छा- आकांक्षा यांना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं, असं त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला.

देशातील ८० कोटी जनतेला मोफत रेशन देण्यात आले आहे. शिवाय सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. देशातील २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याचा आमचा प्रयत्न असून त्या दृष्टीनेचं गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय स्कील इंडिया मिशनच्या माध्यमातून १.४ कोटी तरुणांना ट्रेनिंग देण्यात आलं आहे. तसेच ५४ लाख स्कील्ड तरुण तयार करण्यात आले. ३ हजार नवीनं आयटीआय निर्माण करण्यात आले. तसेच उच्च शिक्षणासाठी ७ IITs, १६ IIITs, ७ IIMs, १५ AIIMS and ३९० विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे, अशी आकडेवारी सीतारमण यांनी सांगितली.

हे ही वाचा:

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

१६४ वर्षांपूर्वी भारतात मांडला गेलेला पहिला अर्थसंकल्प! जाणून घ्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना अटक

यावेळी त्यांनी महिलांबाबत केलेल्या कामांचीही गणती दिली. सीतारमण म्हणाल्या की, “गेल्या दहा वर्षात उच्च शिक्षणात महिलांचं प्रमाण २८ टक्क्यांनी वाढलं आहे. STEM कोर्सेसमध्ये मुली, महिला यांची ४३ टक्के नोंदणी झाली आहे. या सर्व गोष्टींमुळं वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी तिहेरी तलाक बेकायदा ठरवला, संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळांमध्ये एक तृतीयांश महिलांसाठी आरक्षण लागू केलं. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी ७० टक्के घरांची निर्मिती झाल्यानं महिलांचा आत्मसन्मान वाढला आहे, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने चांगले काम केल्याचे त्या म्हणाल्या.

Exit mobile version