ठाण्यात उभारले जाणार ‘अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया’

ठाण्यात उभारले जाणार ‘अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया’

ठाण्यात पाहल्यांदाच ‘अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया’ उभारले जाणार आहे. अतिशय आगळे वेगळे असे हे अकाउंटींग म्युझियम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उभारले जात आहे. सोमवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता केबीपी महाविद्यालयात या म्युझियमचे उदघाटन होणार आहे. आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.

या अकाउंटींग म्युझियमसाठी ठाण्यात प्रथमच वॉल ऑफ अकाउंटन्सी तयार करण्यात आली आहे. ४४ फुट इतकी उंच ही भिंत आहे. या भिंतीवर अकाउंटन्सीचा आजवरचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए निहार जंबूसारिया यांच्या हस्ते या वॉलचे उद्घाटन होणार आहे. ऑनलाइन पध्दतीने हे उद्घटन पार पडेल.

हे ही वाचा:

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला

ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन

२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली

तर आयसीएआय वेस्टर्न इंडिया रिजनल कॉउन्सिलचे चेअरमन मनीष गाडीया हे प्रत्यक्षात या म्युझियमच्या उद्घाटनासाठी ठाण्यात उपस्थित असणार आहेत. त्याच बरोबर व्हाईस चेअरमन दृष्टी देसाई, सेक्रेटरी अर्पित काबरा, खजिनदार जयेश काला, कार्यक्रमाचे समन्वयक सीए योगेश प्रसादे, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. संतोष गावडे उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version