अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४- २५ साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांनी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा वर्गाला दिलासा देण्यात आला आहे. तसेच कर रचनेत म्हणजेच टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. दरम्यान, कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाहीत.” ही मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी केली आहे. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. आता ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही.
मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ७ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले होते. ८ लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 35 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तर ९ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ४५ हजार, १० लाख उत्पन्नावर ६० हजार, १२ लाख उत्पन्नावर ९० हजार आणि १५ लाख उत्पन्नावर १ लाख ५० हजार रुपये टॅक्स भरावा लागणार आहे. यावर्षी हा स्लॅब कायम आहे. त्यात कोणताही बदल केला नाही.
हे ही वाचा:
३० वर्षांनंतर व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चेला सुरुवात!
“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”
इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल
१६४ वर्षांपूर्वी भारतात मांडला गेलेला पहिला अर्थसंकल्प! जाणून घ्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, “वित्तीय तूट ५.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च ४४.९० कोटी रुपये असून अंदाजे महसूल ३० लाख कोटी रुपये आहे. १० वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे.