28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरअर्थजगतइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

Google News Follow

Related

मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी आयकर विभागाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ही मुदत आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे इन्कम टॅक्स रिटर्न हे ३१ डिसेंबर पर्यंत भरणे शक्य होणार आहे.

देशभरातील करदात्यांसाठी दरवर्षीच इन्कम टॅक्स रिटर्न भरणे ही एक अत्यंत महत्वपूर्ण बाब असते. यावर्षी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर या आधीही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. ज्यानुसार व्यक्तिगत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर पर्यंत वाढवली गेली होती. तर कंपन्यांसाठी ही मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. पण आता ही मुदत आणखीन वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आता घरबसल्या काढता येणार बसचे तिकीट

महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’

बायकोच्या त्रासामुळे त्याचे २० किलो वजन घटले!

प.बंगालमधील भाजपा खासदाराच्या घराबाहेर कुणी फेकले क्रूड बॉम्ब?

इन्कम टॅक्स साइट बद्दलही तक्रारी
आयकर विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या इन्कम टॅक्स साईट बद्दलही उपभोक्त्यांच्या बऱ्याच तक्रारी पाहायला मिळाल्या आहेत. साईटमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी आढळून आल्या आहेत म. त्यामुळे करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. इन्फोसिस या सॉफ्टवेअर कंपनीतर्फे या साईटचा कारभार पाहिला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा