भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना खुशखबर

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा

भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना खुशखबर

भू-विकास बँकेतून कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा मिळाला आहे. भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना सांगितले

राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. ही कर्जमाफी ९६४ कोटी १५ लाख रुपयांची असणार आहे. भूविकास बँकेची मालमत्ता सरकारकडे हस्तांतरण केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले सरकारच्या या निर्णयामुळे दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.यामध्ये राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. ३० जून २०२२ पर्यतचे सर्व गुन्हे घेणार मागे घेण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. त्याच बरोबर मराठवाडा, विदर्भ,उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे २,८०० बचत गट निर्माण करण्याचे आणि १५०० महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

 

नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करनयेत येणार आहे . शासनाला दर्जेदार सल्ला व धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की , महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता, १२५० मे टन प्रतिदिन गाळप क्षमता २,५०० मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देणे यासारखे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Exit mobile version