केवळ भारताच्याच नाही, तर जगाच्या अर्थव्यवस्थेला कोविडमुळे फटका बसला होता. मात्र लसीकरणानंतर आता परिस्थिती बदलेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारताच्या विकासाच्या वेगाचा अंदाज देखील नुकताच वर्तवण्यात आला होता.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (इन्ड- रा) या संस्थेने भारताच्या कोरोनोत्तर काळातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. या संस्थेने गुरूवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ९.४ टक्के राहिल. मात्र हा अंदाज लसीकरणाच्या वेगावर अवलंबून असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
‘शिवगर्दी’मुळे कोरोना पसरत नाही
मास्क असेल तरच पुष्पगुच्छ घेणार
कास पठार पर्यटकांसाठी खुले! पण केव्हापासून??
पाकिस्तानला तालिबान प्रेमाची उचकी
या अंदाजामध्ये असेही म्हटले आहे, की ३१ डिसेंबरपर्यंत १८ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण पूर्ण केले तर भारताचा वृद्धीदर ९.६ टक्के राहिल अन्यथा हा वृद्धीदर ९.१ टक्क्यांपर्यंत घसरेल. या संस्थेने त्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज व्यक्त केली आहे.
सध्या भारतातील खरीप काळातील पेरणीला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. नैऋत्य मान्सून पाऊस परतल्याने शेतीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र या काळात भारताची निर्यात वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ही वृद्धी नोंदवण्यात आली होती.
भारतीय अर्थव्यवस्था कोविडच्या धक्क्यातून सावरत असल्याचे चित्र दिसू लागले होते. उत्पादन क्षेत्रातही वृद्धी नोंदली गेली होती.