जागतिक बँकेवर ‘पुणेरी पाटी’; अजय बंगा यांच्याकडे येणार धुरा

जो बायडेन यांनी केली नावाची शिफारस

जागतिक बँकेवर ‘पुणेरी पाटी’; अजय बंगा यांच्याकडे येणार धुरा

मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा हे जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्ष्यपदासाठी नामांकन मिळालेले ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत.

जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी एप्रिल २०२४ पूर्वी ते पद सोडणार असल्याची घोषणा आहे. बंगा हे सध्या जनरल अटलांटिक या खासगी खाजगी इक्विटी फंडचे उपाध्यक्ष आहेत. मूळ भारतीय वंशाचे असलेले बंगा यांचा पुण्यात जन्म झाला आहे. अजय बंगा यांना जागतिक आव्हाने तसेच हवामान बदलाच्या आव्हानांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. बंगा यांचे नाव जागतिक बँकेच्या प्रमुखपदी प्रस्तावित करण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २३ फेब्रुवारी रोजी जागतिक बँकेच्या नवीन प्रमुखासाठी अजय बंगा यांच्या नावाची घोषणा केली. हैदराबाद पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर बंगा यांनी दिल्ली विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूटमधून एमबीए केले. बंगा यांनी १९८१ मध्ये नेस्ले इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता त्याला व्यवसायाचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

मास्टरकार्डमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर त्यांनी सीईओ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अमेरिकेतील रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंक मधील कामाचाही त्यांना अनुभव आहे. बंगा यांनी पेप्सिकोच्या रेस्टॉरंट विभागातही काम केले आहे. भारतात पिझ्झा हट आणि केएफसी सारख्या फूड चेन लाँच करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Exit mobile version