भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात ०. २५ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. रेपो दर ६.२५ % वरून ६.५० % करण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळेआता गृहकर्जाचा हप्ता वाढणार आहे. याआधी रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीची महत्त्वाची बैठक तीन दिवस चालली. यानंतर या बैठकीची माहिती आणि या काळात घेतलेल्या निर्णयांची माहिती घेण्यासाठी शक्तीकांत दास यांनी दिली.
रेपो दर वाढल्यानंतर गृहकर्जाचा हप्ता तसेच कार आणि वैयक्तिक कर्जही महाग होणार आहे. गेल्या वर्षाच्या मी महिन्यापासून रेपो दर ४ टक्क्यांवर स्थिर होता पण आता तो आता ६.५ % पर्यंत वाढला आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत जागतिक परिस्थितीमुळे जगभरातील बँकांना व्याजदर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. महागाई नियंत्रणासाठी हे कठोर निर्णय घेणे आवश्यक होते.
जागतिक आर्थिक परिस्थिती आता पूर्वीसारखी गंभीर राहिलेली नाही. प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वाढीची शक्यता सुधारली आहे. महागाई कमी झाली आहे. तरी देखील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये महागाई अजूनही लक्ष्यापेक्षा जास्त आहे, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ५.६ टक्के राहील, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांचा त्रिपुरात काँग्रेसवर हल्लाबोल
३०,००० जखमी..६,००० इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर.. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो
श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली
मोबाईल चोरट्यांना विवस्त्र करून मारहाण
महागाईवर भाष्य करतांना गव्हर्नर म्हणाले की, २०२३ आर्थिक वर्षा मध्ये महागाईचा दर ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर येऊ शकतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वास्तविक जीडीपी वाढ ६.४ टक्के राहू शकते. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ७.१ टक्क्यांवरून ७.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
रेपो दर म्हणजे काय ?
देशभरातील बँका जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतात, त्यावेळी रिझर्व्ह बँक जो व्याज दर इतर बँकांना आकारते, त्याला ‘रेपो दर म्हणतात. ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करतात किंवा रिझर्व्ह बँक अल्पमुदतीसाठी कर्ज म्हणून घेते, त्यावेळी जो व्याजदर रिझर्व्ह बँकेवर आकारला जातो, त्या व्याजदराला ‘रिव्हर्स रेपो रेट’ म्हणतात.