एलोन मस्क यांनी थांबवली ट्विटरची बोली

एलोन मस्क यांनी थांबवली ट्विटरची बोली

अलीकडेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले होते. आधी ट्विटरने त्यांचा करार नाकारला मग काही दिवसांनी ट्विटरने तो करार स्वीकारला, असे बरेच दिवस ट्विटर आणि मस्क यांचे सुरु होते. मस्क यांच्यामुळे ट्विटर चांगलेच चर्चेत आले आहे. आता पुन्हा मस्क यांनी एक ट्विट करून लोकांना आश्चर्यचकित आणि गुंतवणूकदारांना धक्का दिला आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विट केले की, ‘ट्विटरचा करार तात्पुरता स्थगित करत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्वीटरवर मोठ्या प्रमाणात बनावट खाती आहेत, प्रत्यक्षात पाच टक्क्यांहून कमी युजर्स आहेत ज्यांचे अकाउंट बनावट नाहीत,” त्यामुळे तुर्तास ट्वीटरच्या करार होल्डवर ठेवत आहे. एलॉन मस्क यांनी शुक्रवार, १३ मे रोजी निर्णय जाहीर करताना याचे कारणही ट्वीटमध्ये दिले आहे.

ट्विटरचा करार होल्डवर ठेवल्याची माहिती मिळताच, ट्विटर कंपनीचे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी घसरले आहेत. ट्विटरने मस्क यांच्या ट्विटला लगेच प्रतिसाद दिलेला नाही. या तीन महिन्यांत खोट्या किंवा स्पॅम खाती कमी झाल्याचा अंदाज ट्विटर कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला व्यक्त केला होता. मात्र एलॉन यांच्या ट्वीटमुळे हा अंदाज चुकला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

‘पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं’

चारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण

दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले होते. मस्क यांनी ट्विटरच्या प्रत्येक शेअर्स साठी ५४.२० डॉलर रुपयांची किंमत दिली होती.

Exit mobile version