23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरअर्थजगतइलॉन मस्कचा बिटकॉइनवरही परिणाम

इलॉन मस्कचा बिटकॉइनवरही परिणाम

Google News Follow

Related

टेस्ला आणि स्पेसएक्स या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक इलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं. या ट्विटनंतर बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीला मोठा फटका बसला. इलॉन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचा मार्केटमधील भाव तब्बल १७ टक्क्यांनी घटला. गेल्या वर्षभरापासून बिटकॉईनचा भाव वाढत असताना त्यांच्यासाठी इलॉन मस्क यांचं ट्विट अडचणीचं ठरलं. एलन मस्क यांनी ट्विटमध्ये टेस्लाची कार खरेदी करण्यासाठी बिटकॉईनचा वापर करता येणार नाही, असं म्हटलं होतं. इलॉन मस्क यांच्या ट्विटपूर्वी क्रिप्टोकरन्सीचा भाव ५४ हजार ८१९ अमेरिकन डॉलर होता. तो ४५ हजार सातशे अमेरिकन डॉलरवर आला.

इलॉन मस्क यांनी ट्विट करत टेस्ला कंपनीच्या कार बिटकॉईनद्वारे खरेदी करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. यामध्ये त्यांनी बिटकॉईन मायनिंग आणि त्यासंबंधी जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळं चिंतेत असल्याचं सांगितलं. बिटकॉईन ही चांगली संकल्पना आहे. मात्र, पर्यावरणाला नुकसान पोहोचवायला नको, असं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

इलॉन मस्क यांच्या ट्विटपूर्वी बिटकॉईनच्या एका क्रिप्टोकरन्सीचा भाव ५४ हजार ८१९ अमेरिकन डॉलर होता. भारतीय चलनात त्याची किंमत ४० लाख ३६ हजार ४८ रुपये होते. इलॉन मस्क यांच्या ट्विटनंतर ४५७०० अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात तो भाव ३३ लाख ६४ हजार ६६२ रुपयांवर आला. आला. १ मार्च नंतर पहिल्यांदा बिटकॉईनचा भाव या पातळीवर आला आहे. इलॉन मस्क यांच्या ट्विटनंतर अवघ्या दोन तासांमध्ये बिटकॉईनच्या भावामध्ये ९११९ अमेरिकन डॉलरची घसरण झाली. कॉईनडेस्कच्या अहवालानुसार केवळ बिटकॉईन नव्हे तर इतर १५ क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

हे ही वाचा:

काय आहे कुस्तीगीर सुशील कुमार केसचे काँग्रेस कनेक्शन?

उद्यापासून २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?

लसीकरणासाठी पैसा नाही म्हणणारे सोशल मिडियासाठी सहा कोटी खर्च करतायत

इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं बिटकॉईनचा वापर करुन कार खरेदी करता येईल, अशी घोषणा ८ फेब्रुवारीला केली होती. त्यावेळी बिटकॉईनच्या भावात १४ टक्के वाढ झाली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या ट्रेजरी फंडमध्ये १.५ अब्ज डॉलर बिटकॉईन ठेवेल, असं म्हटलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा