टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठीचा ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. बनावट खात्यांची खरी संख्या लपवून चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याने हा निर्णय घेतल्याचं एलन मस्क यांनी सांगितलं आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर बोर्डाचे अध्यक्ष ब्रेट टायलो यांनी आम्ही कराराची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीला कोणत्याही परिस्थितीत हे विलीनीकरण पूर्ण करायचे असून त्यासाठी आता कायदेशीर मार्ग स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एलन मस्क यांच्या वकिलांनी सांगितले की, “ट्विटरवरील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या, ही खाती कॅप्चर करण्याच्या पद्धतींबद्दलची माहिती आणि कारवाई करणं, हे करार करण्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. या संदर्भात एलन मस्क आणि त्यांची टीम गेल्या दोन महिन्यांपासून सतत ट्विटरसोबत संपर्क साधून माहिती घेत होती. पण प्रत्येक वेळी ट्विटरचे बोर्ड एकतर माहिती देण्यास टाळाटाळ करत होते किंवा अपूर्ण माहिती देत होते.
Elon Musk sends a letter to Twitter seeking to end USD 44 billion deal, citing lack of info on bot accounts: The Associated Press
— ANI (@ANI) July 8, 2022
हे ही वाचा:
गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ
शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; १५ जणांचा मृत्यू
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट
ट्विटरचा हा कारभार पाहून एलन मस्क यांनी ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार पूर्णपणे रद्द केला आहे. एलन मस्क आणि त्यांच्या टीमच्या वतीने ट्विटरच्या प्लॅटफॉर्मवरील बनावट आणि स्पॅम खात्यांबद्दल त्यांना पाच वेळा विचारण्यात आले. मात्र, ट्विटरने त्याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली किंवा अपूर्ण माहिती दिली.
यानंतर, आता ट्विटरकडून असे सांगण्यात आले आहे की, कंपनीला हे विलीनीकरण पूर्ण करायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे.