Twitter बोलणार मस्क बोली

Twitter बोलणार मस्क बोली

‘टेस्ला’ कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. एलॉन मस्क हे ‘ट्विटर’चे नवे मालक बनलेत. ४४ अब्ज डॉलरमध्ये हा करार पार पडला आणि मस्क यांनी ही कंपनी विकत घेतली. सुरुवातीला मस्क यांच्याकडे ट्विटरचे जास्त म्हणजे ९.२ टक्के शेअर्स असल्यामुळे ट्विटरने त्यांना संचालक मंडळात सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, संचालक मंडळ नको ट्विटरचं द्या म्हणत मस्क यांनी ट्विटरमध्ये गुंवणूक केल्यानंतर ट्विटर कंपनीच खरेदी करायची इच्छा व्यक्त केली होती. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठीची इच्छा दाखवली आणि ट्विटरच्या शेअर्सने ९ टक्क्यांची उसळी घेतली. ट्विटरला त्यांनी खरेदी ऑफर दिली होती. तेव्हा ट्विटरने नकार दिला होता. मात्र, ट्विटरल ही चांगली आणि अखेरची ऑफर देत असल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं. ५४.२० डॉलर प्रति शेअर प्रमाणे ट्विटरचे १०० टक्के शेअर्स सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोख देऊन खरेदी करण्याची ऑफर मस्क यांनी दिली होती. वाटाघाटीनंतर हा करार ४४ अब्ज डॉलरला निश्चित करण्यात आला. त्यामुळे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक बनलेत.

एलॉन मस्क आणि ट्विटर यांचे पूर्वीपासून वेगळेच समीकरण होतं. मस्क हे सतत ट्विटर कंपनची आणि त्यांच्या कामकाजाची खिल्ली उडवायचे, त्यावर टीका करायचे. मस्क हे स्वत:ला फ्रीडम ऑफ स्पीचचे मोठे समर्थक मानतात. जेव्हा ट्विटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर बंदी घातली होती, त्या वेळी एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या या धोरणांमध्ये बदल करायला हवा असं म्हटलं होतं.

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल घेतला होता. ट्विटर व्यवस्थित भाषण स्वातंत्र्याचं पालन करत आहे का, या प्रश्नावर त्यांनी वापरकर्त्यांच मत मागितलं होतं. तेव्हा या पोलमध्ये ७० टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर दुसर्‍या दिवशी, मस्क यांनी ट्विट केलं होतं की, यामुळे लोकशाही कमजोर होत आहे आणि ट्विटर भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वांचं पालन करायला अयशस्वी ठरलंय.

तसंच ट्विटरवर एकदा एखादं ट्विट केलं की ते पुन्हा एडीट करता येत नाही. ते तसंच राहतं किंवा डिलीट करता येतं. या मुद्द्याला धरून मस्क यांनी ट्विटरवर लोकांना विचारलं होतं की त्यांना ट्विटरवर एडिट बटण हवंय का? त्यावर २६ लाखांहून अधिक लोकांनी उत्तर दिले होतं. मात्र, ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विट एडिट करण्याच्या कल्पनेला विरोध केला होता. एडीटचा पर्याय दिला तर ट्विटचा अर्थ लोक सहज बदलू शकतील असं त्याचं म्हणणं होतं.

क्रिप्टोकरन्सीसाठी ट्विटरचा आता वापर होण्याची शक्यता आहे. क्रिप्टो मार्केटसाठी मस्क यांची आवड सर्वश्रुत आहेच. टेस्लाने काही काळासाठी पेमेंट म्हणून बिटकॉइनचा स्वीकारही केला होता. त्यामुळे आता ट्विटरची पोहोच आणि इथल्या युझर्सची विविधता लक्षात घेऊन मस्क याला क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करण्याचं व्यासपीठ म्हणूनही वापर करू शकतात.

हे ही वाचा:

भारताचे फ्रान्स फॉलोइंग

‘बोगस’ एफआयआर रद्द करण्यासाठी सोमय्यांनी घेतली राज्यपालांची भेट

‘महाराष्ट्र, केरळ, बंगालने पेट्रोलवरचा कर कमी केला नाही’

रथ ओढताना विजेचा धक्का लागून ११ भाविकांचा मृत्यू

ट्विटरचा करार झाल्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विटर संबंधीची आपली भूमिका स्पष्ट केलीय आहे. ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरचा विश्वास वाढवण्यासाठी काम करायचंय. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुकता आहे. तसंच युझर्ससाठी नवीन दारं उघडली जाणारेत म्हणजेच त्यांनी ट्विटरमध्ये बदल होणार याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांनी पोल घेऊन, प्रश्न विचारून लोकांची जी मतं विचारली आहेत. ट्विटरवर काही कारणामुळे टीका केली होती, बदल सुचवले होते ते सगळे बदल आता ट्विटरवर होणार की नाही हे येत्या काळातच कळेल.

Exit mobile version