रोजगार निर्मिती बरोबरच या वर्षात रस्त्यावर धावणार इतकी इ- वाहने

५ कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार

रोजगार निर्मिती बरोबरच या वर्षात रस्त्यावर धावणार इतकी इ- वाहने

गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत, भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ ठरली. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठेने चांगलीच गती पकडली आहे. गेल्या वर्षात देशात एकूण १० लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. परंतु नवीन वर्षांमध्ये भारतात इलेकट्रीक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर १ कोटींवर जाण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

वाहन बाजारात ५ कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये वाहन उद्योगाचा वाटा ७.१ टक्के आहे. जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा ४९ टक्के आहे. २०२१ च्या अखेरीस या क्षेत्रात ३.७ कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला होता.

 

. हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. सरकार बॅटरी चार्जिंग स्टेशन्स आणि बॅटरी स्वॅपिंग धोरणावरही काम करत आहे. राजधानी दिल्लीत २०२४ पर्यंत प्रत्येक १५ इ-वाहनांसाठी एक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याचे दिल्ली सरकारचे उद्दिष्ट आहे. देशातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.

Exit mobile version