छोट्या अंतरासाठी विद्युत विमाने- नवा पर्याय

छोट्या अंतरासाठी विद्युत विमाने- नवा पर्याय

छोट्या अंतराच्या उड्डाणांकरिता पारंपारिक विमानांना आता विद्युत उर्जेवर चालणाऱ्या विमानांचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. पारंपारिक विमाने ३००-३५० किलोमीटरच्या अंतरासाठी आतबट्ट्याची ठरत असल्यामुळे इतर पर्यायांची चाचपणी जगात चालू आहे.

छोट्या शहरांना जोडण्यासाठी भारत सरकारने उडान प्रकल्पाची घोषणा केली आहे. विजेवर चालणाऱ्या विमानांना लागणारी धावपट्टी केवळ २००-३०० मीटरची लागत असल्याने, ही विमाने किफायतशीर ठरू शकतात. बिझनेस लाईनमध्ये प्रसिध्द झालेल्या लेखात विजेवर चालू शकणाऱ्या विमानांबद्दल सविस्तर लिहीले आहे. 

सध्या उपलब्ध असलेली पारंपारिक विमाने ही दीर्घ पल्ल्याची असतात.  त्यामुळे छोट्या अंतरासाठी ती तोट्याची ठरतात. लहान अंतरासाठी विविध संशोधन संस्था विद्युत विमाने बनविण्याचा प्रयत्नात आहेत. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा एक्स-५७ हे १४ मोटर्सचे विमान बनविण्याच्या प्रयत्नान आहे. विद्युत विमानाच्या उड्डाणासाठी कमी शक्ती लागते. शिवाय आता पदार्थविज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे विमानाचं वजन कमी ठेवणेही शक्य आहे. विमानाच्या पंखांचा आकार, त्याचे वजन, विमानाची रचना यातून त्याच्या उड्डाणासाठी आवश्यक असणारी ऊर्जा कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पारंपारिक विमाने प्रचंड इंधन वापरणारी आहेत. त्यावर उपाय म्हणून या नव्या पर्यायाचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

Exit mobile version