मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलचे भाव ५ रुपयांनी तर डिझेलचे ७ रुपयांनी कमी केले होते. आता ऐन दिवाळीत खाद्य तेलाच्या किमतींमध्येही ५-२० रुपयांची कपात पाहायला मिळणार आहे. मोदी सरकारने आयात शुल्क घटवल्यामुळे या किंमती कमी झाल्या आहेत.
अन्न पुरवठा आणि प्रक्रिया मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले की, देशभरातून गोळा केलेल्या खाद्यतेलाच्या किमतीच्या अहवालाचा हवाला देऊन या आठवड्यात प्रमुख बाजारपेठेत पाम, सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमती ५ ते २० रुपयांनी कमी झाल्या आहेत.
केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, “आयात शुल्कात कपात आणि भागधारकांद्वारे स्टॉकची घोषणा यासह उपाययोजनांमुळे देशातील खाद्यतेलाच्या सुधारित उपलब्धतेमुले या क्षेत्रातील ‘सर्वात वाईट काळ संपला आहे’. मात्र, मोहरी तेलाचे दर अजूनही चिंतेची बाब आहेत. पांडे म्हणाले की ब्रँडेड तेल निर्मात्यांनी नवीन स्टॉकसाठी दर सुधारित केले आहेत.
हे ही वाचा:
आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
विराट सेनेने स्कॉटलंडचा उडवला ८ विकेट्सनी धुव्वा
चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंडोनेशिया, ब्राझील आणि इतर देशांकडे भारताने खाद्यतेल इंधनासाठी वळल्यानंतर, खाद्यतेलाची उपलब्धता कमी झाल्यामुळे जागतिक किमतींनुसार देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. ते म्हणाले की किमती कमी होऊ लागल्या आहेत आणि हा कल कायम राहण्याची शक्यता आहे.
मोहरीच्या तेलाबद्दल पांडे म्हणाले, “आम्ही किमतीत लक्षणीय घट पाहिलेली नाही. पण आयात शुल्क तर्कसंगतीकरणासह सरकारने उचललेल्या पावलांचा मोहरीच्या तेलाच्या किमतीवरही सकारात्मक परिणाम होईल आणि भाव कमी होतील.”