भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा दणका बसला आहे. या तिघांची मिळून ९३७१ कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने या तिघांची तब्बल १८ हजार कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ही रक्कम बँकाच्या बुडित कर्जाच्या ८० टक्के इतकी आहे.
ED not only attached/ seized assets worth of Rs. 18,170.02 crore (80.45% of total loss to banks) in case of Vijay Mallya, Nirav Modi and Mehul Choksi under the PMLA but also transferred a part of attached/ seized assets of Rs. 9371.17 Crore to the PSBs and
Central Government.— ED (@dir_ed) June 23, 2021
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांनाही परदेशातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या तिघांनीही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेले पैसे आपल्या बेनामी कंपन्यांमध्ये वळवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. या तिघांनी मिळून बँकांचे २२,५८५.८३ कोटी रुपये बुडवले होते.
मात्र, ‘ईडी’कडून या तिघांच्याही देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी ९६९ कोटींची मालमत्ता ही परदेशात आहे. आतापर्यंत सरकारी बँकांना ८४४१ कोटी रुपये परत मिळाले आहेत. सध्या विजय माल्ल्या न्यायालयीन लढाईत पूर्णपणे गुंतला आहे. तर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रत्यापर्णाच्या हालचालींना वेग आला आहे.
हे ही वाचा:
नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईकांचे नाव देण्याचीही मागणी
काँग्रेस पाठोपाठ ठाकरे सरकारमधील ‘हा’ पक्ष स्वबळावर
ठाकरे सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु
बँकांच्या खासगीकरणाबाबत मोदी सरकारचे महत्वाचे पाऊल
विजय माल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे माल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे. भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.