30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरअर्थजगतफ्लिपकार्टला ईडीचा दणका

फ्लिपकार्टला ईडीचा दणका

Google News Follow

Related

राज्यात अनेक नेतेमंडळी ईडीच्या रडारवर असताना आता देशातील सर्वात मोठी  ई-कॉमर्स कंपनी रडारवर आलीय. फ्लिपकार्ट आणि त्याचे संस्थापक सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांना १० कोटी रुपये दंड लावला जाईल असा इशारा दिला आहे. फ्लिपकार्टच्या संस्थापकांवर परदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

एका रिपोर्टनुसार  ईडीनं फ्लिपकार्ट आणि त्याचे संस्थापक बंसल बंधूंना कारणे दाखवा नोटीस जारी केलं आहे. त्यांच्याकडे ईडीच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी ९० दिवसांचा अवधी आहे.

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी ई-कॉमर्समधील कंपन्या असलेल्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन.डॉट इंक या कंपन्यांच्या परदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी काही वर्षापासून चौकशी करत आहे. माहिती अशी मिळाली आहे की, फ्लिपकार्टनं परदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केलं आहे.

चेन्नई एजेंसी कार्यालयाकडून फ्लिपकार्ट कंपनीला एक कारण दाखवा नोटीस जुलैच्या सुरुवातीला जारी केली आहे. फ्लिपकार्ट तसेच संस्थापक सचिन बंसल आणि बिन्नी बंसलसह गुंतवणूकदार टायगर ग्लोबल यांना त्यांच्यावर १०,००० कोटींचा दंड का आकारला जाऊ नये यासाठी ही नोटीस बजावली आहे.

हे ही वाचा:

‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ

पुरूष हॉकी संघाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतूक

आज ५ ऑगस्ट…मोदी सरकार साधणार वचनपूर्तीची हॅटट्रिक?

‘वॉलमार्ट’ या अमेरिकन रिटेलर कंपनीने २०१८ साली फ्लिपकार्ट कंपनीमधील १६ अब्ज डॉलर देत हिस्सेदारी अर्थात ४० टक्के शेअर्स खरेदी केले होते. सचिन बंसल यांनी त्यावेळी आपला हिस्सा वॉलमार्टला विकला होता.  ई-कॉमर्स क्षेत्रातील अलिकडच्या काळातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरला होता. जुलै महिन्यात ३.६ बिलियन डॉलरच्या फंडिंग राऊंडनंतर  फ्लिपकार्टचं व्हॅल्युएशन तीन वर्षाच्या आत दुप्पट म्हणजे ३७.६ बिलियन डॉलर झालं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा