अदानी उद्योगसमुहाची मोठी घसरगुंडी; हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे मोठा गोंधळ

हिंडनबर्ग रिसर्चवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अदानी उद्योगसमुहाची तयारी

अदानी उद्योगसमुहाची मोठी घसरगुंडी; हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे मोठा गोंधळ

हिंडनबर्ग रिसर्च कंपनीने केलेल्या आरोपानंतर भारतातील अग्रगण्य उद्योगपती अदानी यांच्या उद्योगसमुहाचे समभाग धाडकन कोसळले. जवळपास २० टक्के समभागांमध्ये घसरण झाल्यामुळे समभागधारकांना मोठा फटका बसला आहे.

अदानी यांच्या टोटल गॅसचे १९.६५ टक्के समभाग कोसळले, अदानी ट्रांसमिशनचे १९ टक्के, अदानी ग्रीन एनर्जीचे १५.५० टक्के, अदानी एंटरप्रायझेसचे ६.१९ टक्के यांच्यासोबत अदानी पोर्ट्स अँड स्पेशन इकॉनॉमिक झोनचे समभाग ५.३१ टक्के अदानी विल्मरचे ५ टक्के, अदानी पॉवरचे ४.९९ टक्के समभाग घसरल्याचे समोर आले आहे.

एकीकडे हे समभाग कोसळत असले तरी अदानी यांनी हिंडनबर्ग रिसर्च विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून हिंडनबर्गवर दंडात्मक कारवाई करण्याचा विचारही अदानी उद्योगसमुहातर्फे व्यक्त करण्यात आले आहे. अदानी उद्योगसमुहाने म्हटले आहे की, हिंडनबर्ग रिसर्चने आमच्या समभागांना धक्का पोहोचले असे काम केले आहे. तिकडे हिंडनबर्गने मात्र आपण आपल्या या संशोधनावर कायम आहोत, असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

अमृता फडणवीस यांचे देशभक्तीपर नवीन गीत

भारतात दक्षिण आफ्रिकेतून १०० हून अधिक चित्ते येणार

पद्मभूषण विजेते भैरप्पा म्हणतात, बीबीसीची डॉक्युमेंट्री देशाचे नाव खराब करण्यासाठी

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

अदानी उद्योगसमुहाचे जतिन जलुंधवाला यांनी म्हटले आहे की, हिंडनबर्ग यांनी चुकीच्या उद्देशाने हे संशोधन केले असून २४ जानेवारी २०२३ला कोणत्याही अभ्यासाविना केलेला हा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला. या संशोधनामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये जे चढऊतार पाहायला मिळत आहेत, ते चिंताजनक आहेत. त्यामुळे हे केवळ अदानी उद्योगसमुहाच्या समभागांना नुकसान व्हावे या उद्देशानेच हा अहवाल तयार करण्यात आला आहे. आम्ही या अहवालामुळे चिंतित आहोत आणि अमेरिकेत तसेच भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार हिंडनबर्ग अहवालाविरोधात लढा देऊ.

अदानी उद्योगसमूह गेल्या काही वर्षांत जगभरात नामांकित उद्योगसमुहात अग्रणी राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या शेअर्सचे गडगडणारे भाव पाहता अर्थजगतात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version