सौदी अरेबियाच्या तेल केंद्रावर ड्रोन हल्ला झाल्याने तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कडाडले आहेत. त्यात ओपेक प्लस राष्ट्रांनी देखील मागील आठवड्यापासून एप्रिल पर्यंत उत्पादन कमीच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तेल टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तेलाची किंमत $७० प्रति बॅरल झाली आहे.
हे ही वाचा:
या वर्षभरात तेलाचे भाव ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. बँकिंग क्षेत्रातील गोल्डमन सॅक्स यांनी तेलाचे भाव अजून वाढून $८० बॅरल पर्यंत वाढण्याची शक्यता पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे.
सौदी अरेबियाच्या रास तनुरा हे निर्यातीचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी तेल साठवलेल्या केंद्रावर ड्रोन हल्ला झाला. रविवारी झालेला हा हल्ला समुद्रामार्फत करण्यात आला होता.
मात्र तरीही तेलाच्या उत्पादनावर विशेष परिणाम झाला नव्हता ही गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.
यापूर्वी २०१९ मध्ये देखील सौदी अरेबियातील बऱ्याच तेलक्षेत्रांवर हल्ला झालेला होता. यामध्ये महत्त्वाच्या तेल प्रक्रिया केंद्रांचा देखील समावेश होता त्याबरोबरच मोठ्या तेल उत्पादन केंद्रांचा देखील समावेश होता. या हल्ल्याचा परिणाम म्हणून बरेच दिवस तेल उत्पादन घटले होते. त्यामुळे तेलाचे भाव चढे राहिले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे भाव अजून कडाडणार असल्याने भारतासारख्या देशांना दिलासा मिळालेला नाही.