सणांच्या काळात प्रवासी वाहनांची विक्री सुसाट

ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये २३ टक्क्यांनी वाढ

सणांच्या काळात प्रवासी वाहनांची विक्री सुसाट

सणांच्या काळात मागणी वाढल्याने देशातील प्रवासी वाहनांची सुसाट विक्री झाली आहे. प्रवासी वाहनांची घाऊक विक्री गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये २३ टक्क्यांनी वाढून ९,३४,९५५ युनिट झाली. त्याआधीच्या वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये ७,६१,१२४ वाहनांवही विक्री झाली होती. वाहन उतपदकांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) ही माहिती दिली आहे.

सियामने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७ टक्क्यांनी वाढ झाली आणि ती २,३५,३०९ वाहनांवर गेली आहे. त्याआधीच्या वर्षातील डिसेंबर मध्ये एकूण २,१९, ४२१ वाहनांची विक्री झाली झाली होती. व्यावसायिक, तीनचाकी आणि दुचाकी यांसारख्या श्रेणींमध्ये घाऊक विक्रीत वाढ झाली आहे. सणांच्या काळात मागणी वाढल्यामुळे सर्व श्रेणींमध्ये चांगली विक्री झाली. मात्र, ग्रामीण भागातील मागणी अजूनही कमकुवत आहे असे सियांचेचे महासंचालक राजेश मेनन यांनी म्हटले आहे.

गेल्या तिमाहीत, एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर १७ टक्क्यांनी वाढून २,२७, १११ वाहनांवर गेली. दुचाकी विक्री ६ टक्क्यांनी वाढून ३८,५९,०३० वाहनांवर गेली. डिसेंबर तिमाहीत १,३८,५११ तीनचाकी वाहनांची विक्री झाली आहे. आली. वर्षभरापूर्वी याच कालावधीत८२,५४७ दुचाकींची विक्री झाली आहे. . गेल्या डिसेंबर तिमाहीत, एकूण विक्री ४६,६८, ५६२ वाहनांवरून वाढून ५९,७५८ वाहनांवर गेली आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

२०२२ मध्ये विक्रीचा नवा विक्रम 
प्रवासी वाहनांनी आतापर्यंतची सर्वाधिक ३८लाख वाहनांची विक्री नोंदवली आहे. २०१८ मधील मागील उच्च विक्री पातळीपेक्षा हे जवळपास चार लाख वाहनांनी जास्त आहे. तसेच गेल्या वर्षी ९.३ लाख व्यावसायिक वाहनांची विक्री झाली होती. २०१८ मागील उच्चांकापेक्षा ते सुमारे ७२,००० वाहनांनी कमी आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एकूण दुचाकी विक्रीत १०,१५,९४२ वरून १०,४५,०५२ अशी वाढ झाली.

Exit mobile version