धनत्रयोदशीला धन धना धन!! ३९ टन सोन्याची विक्री

गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्के जास्त सोने खरेदी

धनत्रयोदशीला धन धना धन!! ३९ टन सोन्याची विक्री

दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दोन दिवस आधी १९,५०० कोटी रुपये किमतीच्या जवळपास ३९ टन सोन्याची विक्री झाली असल्याचे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने म्हटले आहे. या वर्षी धनत्रयोदशीला गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्के जास्त सोने खरेदी झाली असल्याचे दिसून आले आहे.

धनत्रयोदशी हा दिवस मौल्यवान धातूंपासून ते भांडीपर्यंतच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो, यावर्षी धनत्रयोदशी सोमवार २४ ऑगस्ट रोजी होती. त्याआधी शनिवार २२ आणि रविवार २३ ऑक्टोबरला सराफा बाजारामध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे धनत्रयोदशीच्या आधी या दोन्ही दिवशी प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,१३९ रुपये होता . गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीला हाच भाव ४७,६४४ रुपये होता. सोन्याच्या किंचित वाढलेल्या किमतीही या वर्षी ग्राहकांना खरेदी करण्यापासून रोखू शकल्या नाहीत.

या धनत्रयोदशीला सोन्याच्या खरेदीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३० टक्क्यांनी जास्त होते. मागील वर्षी झालेल्या ३० टन सोने विक्रीच्या तुलनेत यावर्षी जास्त ३९ टन सोन्याची विक्री झाल्याचे या संस्थेने म्हटले आहे.२३ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे ज्वेलरी मार्केटमध्ये काही काळ शांतता होती. पण सामन्यानंतर गर्दी वाढली आणि दुकाने खरेदीच्या गजबजली, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष आशिष पेठे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले

गुगलला पुन्हा एकदा दणका

नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज

मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी

 

८० टक्के खरेदी दागिन्यांची 

या वर्षी सुमारे ८० टक्के खरेदी दागिन्यांची होती आणि उर्वरित सराफा, जे लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास परत आला आहे आणि खप सर्वकालीन उच्चांकावर असल्याचे दर्शविते, असे पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. बहुतेक ग्राहकांनी डिजिटल पायमेन्टला प्राधान्य दिल्याचा नवीन काळ दिसून आला आहे. या वर्षी धनत्रयोदशीच्या दोन दिवसांच्या मध्यावर २५ हजार कोटींच्या दागिन्यांची विक्री झाली. दिवाळी सणादरम्यान विक्रीचा एकूण आकडा १.५ लाख कोटींच्या पुढे जाईल अशी आशा कॅट या संस्थेने व्यक्त केली आहे

 

Exit mobile version