सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या ‘निती’ला बळ

सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या ‘निती’ला बळ

सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणाला चालना देण्यासाठी निती आयोगाने १०० सरकारी कंपन्यांचे पुढील चार वर्षांत खासगीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

निती आयोगाने तयार केलेली ही यादी विविध मंत्रालयांकडे देखील पाठवण्यात आली आहे. त्याबरोबरच निती आयोगाने प्रशासकिय मंत्रालयाला त्यांच्याकडील कंपन्यांची यादी बनविण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील चार वर्षांच्या कालावधीत या कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार आहे. निती आयोगाने यादीत समाविष्ट केलेल्या या १०० कंपन्यांची एकूण संपत्ती सुमारे पाच लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. यामुळे सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणाला चालना मिळणार आहे. या कंपन्यांच्या खासगीकरणाचे पुढील चार वर्षांचे वेळापत्रक देखील निती आयोगाकडून तयार केले जात आहे.

हे ही वाचा:

आफ्रिकेतून परत पाठवलेली लस?- अतुल भातखळकर

ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

भारताची चीनी टेलिकॉम उत्पादकांना टक्कर

पश्चिम बंगाल पोलिसांची ममताच्या विरोधात ‘साक्ष’

एका अभ्यासानुसार ७० सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या तोट्यात आहेत. या कंपन्यांचा एकत्रित तोटा सुमारे ₹३१,६३५ कोटी एवढा आहे. मागील महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोट्यात चालणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ह्या करदात्यांवर बोजा असल्याचे मत व्यक्त केले होते. मोदी सरकारने आर्थिक वर्ष २२ मध्ये ₹१.७५ लाख कोटींच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. आर्थिक वर्ष २२च्या अर्थसंकल्पात जी राज्ये मोठ्या प्रमाणात निर्गुंतवणुक करतील त्यांना इन्सेन्टीव्ह देण्याची तरतुद करण्यात आली आहे.
या कंपन्यांत बंदरे, क्रुझ टर्मिनल, टोल रोड बंडल्स, ट्रान्समिशन टॉवर, तेल आणि वायु पाईपलाईन, रेल्वे स्थानके, वापरात असलेली मेट्रो स्थानके, खेळाची मैदाने, डोंगरी रेल्वे, गोदामे यांचा समावेश आहे.
Exit mobile version