बी.ई.एम.एल मधून सरकारची निर्गुंतवणुक

बी.ई.एम.एल मधून सरकारची निर्गुंतवणुक

भारत अर्थ मुव्हर लिमिटेड (बीईएमएल) मधून भारत सरकर निर्गुंतवणुक करणार आहे. यासाठी सरकारने भारतीय आणि विदेशी कंपन्यांकडून इओआय मागवल्या आहेत.

या कंपनीतील काही निर्गुंतवणुक करण्याच्या निर्णयाला सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. याबरोबरच सरकारने व्यवस्थापकीय बदलाचा देखील निर्णय घेतला आहे. सध्या या कंपनीत ५४.०३ टक्के भागीदारी सरकारची आहे. इओआय भरण्याची शेवटची तारिख दिनांक १ मार्च २०२१ आहे. इओआयच्या परिक्षणानंतर यशस्वी बोलीदारांना पुढील फेरीसाठी निवडले जाईल. त्यानंतर आवश्यक त्या पुढील कारवाईला प्रारंभ होईल.

या बोलीसाठी अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात यशस्वी होणाऱ्या कंपनीस काही ठराविक टक्के रक्कम खुल्या भांडवली बाजारातून उभी करणे सक्तीचे असणार आहे. ही प्रक्रिया बीईएमएलमध्ये त्या कंपनीची भागीदारी २५ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर लगेच करावी लागेल.

कंपनीने २०१७ मध्ये एका निर्णयाद्वारे आपल्या जमिनींची संचालित आणि असंचालित अशी विभागणी केली होती. असंचालित जमीन अतिरिक्त मानून ती या निर्गुंतवणुकीचा भाग नसेल असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत योग्य ती यंत्रणा निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच केली जाईल.

Exit mobile version