प्रत्यक्ष कर संकलनाची उसळी

कर संकलनात झालेली वाढ दर्शवते भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद

प्रत्यक्ष कर संकलनाची उसळी

या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून एकूण कर संकलनात २३.८ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रविवारी सांगितलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर या कालावधीत कॉर्पोरेट करात १६.७४ टक्के आणि वैयक्तिक व प्राप्तिकर संकलनात ३२.३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं सरकारने जाहीर केलेल्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. कर संकलनात झालेली वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दर्शवते.

या आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर दरम्यान प्रत्यक्ष कर संकलन ८.९८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत २३.८ टक्के अधिक आहे. दुसरीकडे, जर यातून परतावा वगळला गेला, तर कॉर्पोरेट कर आणि वैयक्तिक आयकरासह थेट कर संकलन ७.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि ते गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.३ टक्क्यांनी जास्त आहे. आतापर्यंत एकूण कर संकलन बजेट अंदाजाच्या ५२.४६ टक्के आहे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने  जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे .

हे ही वाचा:

धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख

नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक

बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक

शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान

ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांनी वाढली आहे. यासह, प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने विकसित होत आहे. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय सातत्याने व्याजदर वाढवत आहे, त्यामुळे भविष्यात भारताचा विकास दर खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version