अदानी पोर्ट ऍण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन कडून (एपीएसईझेड) दिघी बंदर अधिग्रहणाच्या सर्व प्रक्रियांची पूर्तता होऊन ₹७०५ कोटींना ते ताब्यात घेतले आहे. अदानीकडून अजून ₹१०,००० कोटींची गुंतवणुक करून जवाहरलाल नेहरु बंदराला पर्याय म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
हे ही पहा:
मुंबईचे जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील १२ प्रमुख बंदरांपैकी तर एक आहेच, त्याशिवाय भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे.
अदानीने दिघी पोर्ट लिमिटेडची मालकी घेतली आहे. राजापुरी खाडीवर वसलेले हे बंदर महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात आहे. मुंबईपासून केवळ ४२ सागरी मैल दूर असलेल्या दिघी बंदराचा वापर एपीएसईझेडला त्यांच्या मुंबई आणि पुणे येथील ग्राहकांना सेवा देण्यासाठी करता येणार आहे. त्याबरोबरच एपीएसईझेड या बंदराच्या सहाय्याने उत्तर कर्नाटक, पश्चिम तेलंगण आणि मध्य प्रदेश या देशांतर्गत ग्राहकांना सेवा देता येणे शक्य होणार आहे. यामुळे देशांतर्गत भागातील आर्थिक व्यवहार ९० टक्क्यांनी वाढवता येतील.
एपीएसईझेड या बंदरात अजून ₹१०,००० कोटींची गुंतवणुक करून अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या मालाची हाताळणी करू शकणाऱ्या बंदराची निर्मीती करणार आहे. त्यामुळे मालाची सहज हाताळणी शक्य आहे.