मालवाहतूकीवर रेल्वेचा सर्वाधिक खर्च

मालवाहतूकीवर रेल्वेचा सर्वाधिक खर्च

चालू आर्थिक वर्षात रेल्वेने मालवाहतूकीच्या स्वतंत्र मार्गिकेसाठी सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात स्वतंत्र मालवाहतूकीच्या प्रकल्पावर एकूण १४,००० कोटींचा भांडवली खर्च करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सी.ई.ओ वि.के. यादव यांनी दिली आहे. 

आर्थिक वर्ष २०२० मध्ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डी.एफ.सी.सी.आय.एल.)ने १२,२६३ कोटी खर्च केले. याउलट आर्थिक वर्ष २०१९ मध्ये हा खर्च केवळ १०,०३४ कोटी होता. मागील वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात जास्त खर्च करण्यात आला होता.

हे ही वाचा: भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात पार्सल डबे बनविण्याच्या तयारीतकोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर

यादव यांच्या सांगण्यानुसार सध्या सगळ्यात जास्त गाड्या हाताळणारा कानपुर- खुर्जा विभागाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच केले जाणार आहे. या मार्गावर ११५ गाड्या चालवल्या जातात. यापैकी ६० गाड्या या मालवाहतूकीच्या असतात तर ५५ गाड्या प्रवासी वाहतूकीच्या आहेत. 

इतर स्वतंत्र मालवाहतूक मार्गिकेच्या प्रकल्पांचा अहवाल डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल. यात खरगपूर- विजयवाडा, भूसावळ- नागपूर- खरगपूर- धानकुनी, राजखर्सवान- अंदाल आणि विजयवाडा- इटारसी या मार्गांचा समावेश होते.

Exit mobile version