डिमॅट खात्यांच्या संख्येत झाली दणदणीत वाढ

खात्याची संख्या १०. ८ कोटी

डिमॅट खात्यांच्या संख्येत झाली दणदणीत वाढ

शेअर ट्रेडिंगसाठी वापरल्या जाणार्‍या डिमॅट खात्यांच्या संख्येत दणदणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या डिसेंबरमध्ये डिमॅट खात्याची संख्या १०. ८ कोटी झाली आहे. वार्षिक आधारावर त्यात ३४ % वाढ झाली आहे. शेअर बाजारातून मिळालेला आकर्षक परतावा, खाते उघडण्याची सुलभ प्रक्रिया आणि आर्थिक बचतीमुळे डिमॅट खात्यांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

मागील तीन महिन्यांच्या तुलनेत डिमॅट खात्यांच्या संख्येत डिसेंबरमध्ये जास्त वाढ झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील सरासरी खाती २९ लाखांपेक्षा कमी आहे. डिसेंबर मध्ये २१ लाख होती, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी १८ लाख आणि सप्टेंबरमध्ये २० लाख अशी डिमॅट खात्यांची संख्या होती.

आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये डिमॅट खात्यांची संख्या डिसेंबर २०२१ मध्ये ८. १ कोटींच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढून १०. ८ कोटी झाली आहे. इक्विटी मार्केटमधून आकर्षक परतावा आणि ग्राहकांसाठी ब्रोकर्सद्वारे खाते उघडण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे गेल्या वर्षी डिमॅट खाती वाढली आहेत.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

तथापि, डीमॅट खात्यांच्या वाढत्या संख्येत राष्ट्रीय शेअर बाजारातील सक्रिय ग्राहकांची संख्या गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने कमी होत आहे. उद्योगातील सक्रिय वापरकर्ता ग्राहकांची वार्षिक दर वर्षी१२टक्के वाढ झाली, परंतु डिसेंबर २०२२ मध्ये मासिक आधारावर एक टक्क्याने घटून ३५ दशलक्ष झाली.

Exit mobile version