इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

शेअर बाजाराने दिलेल्या चांगल्या परताव्याचा परिणाम

इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

शेअर बाजार आणि शेअर बाजाराशी संबंधीत योजनांमध्ये डीमॅटद्वारे गुंतवणूक करण्याचा लोकांचा कल वाढत आहे. डिमॅट खात्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारीमध्ये ३१ टक्के अधिक डिमॅट खाती उघडण्यात आली असून आता त्यांची एकूण संख्या जानेवारीमध्ये ११ कोटी झाली आहे.

गेल्या महिनाभरात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले, मात्र असे असतानाही डिमॅट खाती उघडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जानेवारीमध्ये नव्याने उघडलेल्या खात्यांची संख्या मागील चार महिन्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या एका वर्षात डिमॅट खाती वाढण्याचे मुख्य कारण शेअर बाजाराने दिलेला चांगला परतावा आणि ब्रोकर्सनी त्यांच्या क्लायंटसाठी खाते उघडण्याची सोपी प्रक्रिया हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जानेवारीमध्ये नव्याने उघडलेल्या खात्यांची संख्या २२ लाख होती. डिसेंबरमध्ये २१ लाख आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी २० लाख होती . आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये डिमॅट खात्यांची संख्या ११ कोटींवर गेली आहे. जानेवारी २०२२ मध्ये हा आकडा ८.४ टक्के होता. डीमॅट खात्यांची संख्या वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढली असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विश्लेषणात म्हटले आहे.

हे ही वाचा:

खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

लगानची कॉमेंट्री झाली मूक .. जावेद खान यांनी घेतला जगाचा निरोप

सत्यजित तांबे ट्विटमधून नेमके म्हणताहेत तरी काय?

राष्ट्रीय शेअर बाजारातील सक्रिय खात्यांच्या संख्येत मासिक आधारावर २.९ टक्क्यांनी घसरण होऊन जानेवारीमध्ये ३४० लाखांवर आलेली आहे. ही सलग सातवी मासिक घसरण आहे . वार्षिक आधारावर, अशा सक्रिय वापरकर्त्यांची संख्या २.७ टक्क्यांनी वाढली आहे.कोविडनंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनापूर्वी एकूण डिमॅट खात्यांची संख्या सुमारे ४ कोटी होती. गेल्या वर्षात ऑगस्टमध्ये प्रथमच ही संख्या १० कोटींवर गेली. त्याआधीच्या महिन्यापर्यंत फक्त सीडीएसएलकदे ७.२५ कोटी डिमॅट खाती होती, जी एनएसडीएल मधील डिमॅट खात्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे.

Exit mobile version