आयपीएल आता ‘टाटां’ची

टाटा समूहाने पुन्हा एकदा टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले

आयपीएल आता ‘टाटां’ची

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२४ आता लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले असून त्याआधी टाटा समूहाने पुन्हा एकदा लीगची टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले आहेत. टाटा समूहाने २०२८ पर्यंत टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा टाटा आयपीएल असेच नाव असणार आहे. या कालावधीत टाटा समूह बीसीसीआयला दरवर्षी ५०० कोटी रुपये देणार आहे. टाटा समूह बीसीसीआयला पुढील पाच वर्षांसाठी टायटल स्पॉन्सर म्हणून २ हजार ५०० कोटी रुपये देणार आहे.

टाटा समूहाच्यासोबत आदित्य बिर्ला समूह देखील आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशीप मिळविण्या साठीच्या शर्यतीत होता, त्यांनीही २ हजार ५०० कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, शेवटी टाटा समूहाने ही बोली जिंकली. टाटा समूहाने २०२२ मध्ये हे हक्क विवो कडून बोलीमध्ये जिंकले होते.

दरम्यान, ड्रीम ११ ला एका हंगामासाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे हक्कही मिळाले आहेत. यापूर्वी २००८ मध्ये पेप्सीलाही टायटल स्पॉन्सरचे हक्क मिळाले होते. दरम्यान, स्पॉन्सरशिपसाठी चीनी कंपन्यांना संधी देणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.

हे ही वाचा:

अमेरिकेचा येमेनमधील हुती दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला

२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर!

नोएडामध्ये एअर इंडिया कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या!

बिल्किस बानोप्रकरणी रविवारपर्यंत आत्मसमर्पण करा!

यापूर्वी २०१८ मध्ये विवोने पाच वर्षांसाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळवले होते. यामध्ये २ हजार १९९ कोटी रुपयांचा करार झाला होता. पण एका वर्षातच हा करार करोनामुळे थांबला. कोविडच्या काळात ड्रीम ११ ने आयपीएलच्या एका हंगामासाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवली होती. पुढे टाटा समूहाला आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळाले. टाटा समूह २०२२ पासून आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. २०२२ आणि २०२३ सीझनसाठी टाटांनी बीसीसीआयला ३६५ कोटी प्रति सीझन दराने ७३० कोटी दिले होते.

Exit mobile version