अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि हा अर्थसंकल्प कसा सर्वसमावेशी आहे, याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, विशेष म्हणजे पायाभूत सुविधा क्षेत्रात १० लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे हे महत्त्वाचे पाऊल आहे. रेल्वेतही २ लाख ३० हजार गुंतवणूक केली असून २०१३-१४ शी त्याची तुलना केली ती ९ पटीने अधिक आहे. विकासाची गती वाढण्यासाठी हा मोठा फायदा होईल.
राज्यांना १ लाख ३० हजार कोटी रुपये ५० वर्षांसाठी व्याजमुक्त पद्धतीने देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचाही फायदा होईल. शेती व शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे त्यांना बाजारपेठेशी जोडणे अधिक वेगवान आणि सोपे होणार आहे. धान्यांच्या बाबतीतही अर्थसंकल्पाने विशेष लक्ष दिले आहे. मिलेट्सला श्री अन्न म्हटले गेले आहे. भारताला त्यातून ग्लोबल हब म्हणून विकसित करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
सिकल सेलचे निर्मूलन हीदेखील एक महत्त्वाची घोषणा केली गेली आहे. याविषयी फडणवीस म्हणाले की, आदिवासी क्षेत्रात सिकल सेल हा मोठा आजार आहे. त्याच्या निर्मूलनाची घोषणा म्हणूनच महत्त्वाची आहे. त्याचा मोठा फायदा आदिवासी भागात होईल. अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींसाठी ज्या योजना केल्या आहेत त्यासाठीही सरकारने निधी दिला आहे. एकूणच सर्वजनहिताय असं बजेट आहे.
प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना यात ८० टक्के लोकांना मोफत अन्नधान्य दिले जाते. सहकार क्षेत्रात मोठे बदल आहे. महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधान, अर्थमंत्री सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार व्यक्त करतो की, हा निर्णय घेण्यात आला. त्याआधी साखर उद्योगाला आयकर लागत होता. पण मोदीजींनी तो बंद केला. १० हजार कोटींची थकबाकी होती. सरकारने २०१६च्या आधी जी उसाच्या खरेदी रकमेवर त्यांना आयकर नाही. २० वर्षे यासाठई मागणी होती उस शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यांना भावही मिळेल. आदिवासींमधील जमातींसाठई योजना आहे. युवकांना कौशल्य योजना आहेत या योजना विशेष करून रोजगार निर्मिती देणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
रोजगार निर्मिती बरोबरच या वर्षात रस्त्यावर धावणार इतकी इ- वाहने
निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ‘सप्तर्षी’चा केला उल्लेख?
अदानी एन्टरप्रायझेसने केलेल्या शेअरविक्रीला तुफान प्रतिसाद
भारतविरोधी षडयंत्राचे मूळ आय़एमएफच्या आकडेवारीत…
मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आयकर खात्याच्या स्लॅबमध्ये बदल केले. ५ लाखाऐवजी ७ लाख उत्पन्नावर आता कर नाही. मध्यमवर्गाला आनंद देणारा निर्णय. मध्यमवर्ग व सामान्य लोकांना याचा फायदा होईल, असेही फडणवीस म्हणाले. या अर्थसंकल्पाबाबत काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या आलेल्या प्रतिक्रियेबद्दल फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी सकाळीच आपली प्रतिक्रिया ठरवली ही. त्यांनी बजेट बघितले नाही अभ्यासही नाही. त्यांना मेरीटही पाहायाचे नाही. त्यांच्या प्रतिक्रियेवर मी बोलावे एवढा दमच त्यात नाही.