हुश्श…आता ३० जूनपर्यंत करा पॅन आधारशी लिंक

अंतिम मुदतीत तीन महिन्यांनी वाढ

हुश्श…आता ३० जूनपर्यंत करा पॅन आधारशी लिंक

केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची तारीख केंद्र सरकारने वाढवली आहे. आधार कार्ड पॅनशी जोडण्याची अंतिम तारीख तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. आता ३० जून पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करता येणार आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

याआधी सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असल्याचे सांगण्यात आले होते. एखाद्याने असे केले नाही तर त्याचा पॅन निष्क्रिय केला जाणार होता. त्यामुळे प्राप्तिकर भरण्यात तसेच आर्थिक व्यवहार करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची सर्वांची धावपळ सुरू होती. पण आता तीन महिन्यात कधीही लिंक करता येऊ शकणार आहे.

सध्याच्या प्रणालीनुसार, ज्या व्यक्तीचा पॅन आधारशी जोडलेला नाहीत ते प्राप्तिकर खात्याच्या वेबसाइटला भेट देऊन सहजपणे पॅन आधार कार्ड शी लिंक करू शकतात तो. मात्र, यासाठी त्याला १,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

नवीन मुदतीनंतर, जर तुम्ही तुमचा पॅन ३० जून २०२३ पर्यंत आधारशी लिंक केला नाही तर १ जुलै २०२३ पासून तुमचा पॅन निष्क्रिय होईल. आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ अ नुसार, १जुलै २०१७ पासून सर्व पात्र पॅनधारकांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा:

पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’

टोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात

पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’

पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे कसे तपासायचे
पायरी १: प्राप्तिकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट देऊन आधार स्थितीवर जा किंवा येथे क्लिक करा – incometaxindiaefiling.gov.in/aadhaarstatus
पायरी २: पॅन आणि आधार क्रमांक समाविष्ट करा
पायरी ३: ‘आधार स्टेटस लिंक पहा’ वर क्लिक करा
पायरी ४: लिंकचे स्टेटस पुढील स्क्रीनवर दिसेल

Exit mobile version