चला… महागाईने दिला दिलासा

खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाई कमी झाली

चला… महागाईने दिला दिलासा

महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. देशातील किरकोळ महागाईचा दर अखेर खाली येऊ लागला आहे. ऑक्टोबर २०२२ साठी घरगुती ग्राहक किंमत निर्देशांक सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६. ७७ टक्क्यांवर आला आहे. ऑगस्टमध्ये तो ७ टक्के होता तर सप्टेंबरमध्ये तो ७.४१ टक्के होता. किरकोळ महागाई सप्टेंबर २०२१ मध्ये ४.३५ टक्के होती

खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. भारतातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये ७.४१ % पर्यंत वाढली आहे. जी वाढत्या अन्नाच्या किमती आणि उच्च ऊर्जा खर्चामुळे एप्रिलनंतरची सर्वाधिक आहे.

सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार घाऊक महागाई १९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. मार्च २०२१ नंतर प्रथमच घाऊक महागाई एक आकडी झाली आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर १०.७० टक्क्यांवर होता. ऑगस्टमध्ये ती १२.४१ टक्के होती . ऑक्टोबर २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमढील ७.४१ % च्या पाच महिन्यांच्या उच्चांकावरून ६.७३ % पर्यंत कमी होईल असा अंदाज होता की . परंतु तो अजूनही रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्य श्रेणीपेक्षा जास्त आहे.

हे ही वाचा:

आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

आरबीआय आणि सरकारच्या प्रयत्नांचे फळ

महागाई हे मोठे आव्हान असल्याचे सांगून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर ७ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची आशा व्यक्त केली होती. किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये वाढून ७.४ टक्क्यांवर पोहोचली आहे, ऑगस्टमध्ये ती ७ टक्के होती शक्तीकांता दास म्हणाले होते की ऑक्टोबरमध्ये महागाई कमी होईल, कारण सरकार आणि आरबीआयकडून गेल्या ६ -७ महिन्यांपासून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

Exit mobile version