भारतीय बंदरांपुढे क्रेनचे संकट

भारत सरकारने चीनमधून आयात करण्यावर निर्बंध लादले आहेत. यामुळे बंदरातील क्रेन चालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध क्रेन उत्पादकांकडून खरेदी केल्यानंतर विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

भारतीय बंदरांपुढे क्रेनचे संकट

भारत सरकारने चीनमधून आयात कराण्याच्या वस्तूंवर कडक निर्बंध लादल्यामुळे सरकारी खासगी भागिदारी अंतर्गत चालणाऱ्या बंदरांसमोर क्रेनचे संकट उभे राहिले आहे. बंदरात कंटेनर हाताळणीसाठी लागणाऱ्या क्रेन चीनमधून आयात कराव्या लागतात. या निर्बंधांमुळे या क्रेनच्या आयातीवर संकट आले आहे. 

भारत आणि चीन गेल्या काही दिवसांत विविध कारणांमुळे एकमेकांसमोर आले आहेत. कोविड, लडाख मधील सीमा प्रश्न अशा स्फोटक पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनमधून आयात करायच्या वस्तूंवर कडक निर्बंध लादले होते. आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारने नवीन निर्बंध लादण्यापूर्वीच काही चीनी बनावटीच्या क्रेन बंदरात रोखल्या गेल्याचे कळले आहे. 

बंदरातील एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनकडून क्रेन आयात केल्यावर ती लवकर मिळते. युरोपियन क्रेन उत्पादकांकडून क्रेन मिळायला अधिक वेळ लागतो. त्याशिवाय दोन क्रेनची एकत्र हाताळणी करायची वेळ पडल्यास वेगवेगळ्या बनावटीच्या क्रेन एकाच वेळी हाताळणे अवघड असते, असेही त्याने सांगितले. 

सरकारी खासगी भागीदारीतील बंदरे आधीपासूनच चीनी क्रेन वापरत आहेत. त्यांच्या सुट्या भागांच्या आयाती बाबत देखील ही बंदरे साशंक आहेत. भारतात सध्या विविध बंदरांत मिळून २५० चीनी बनावटीच्या क्रेन वापरात आहेत.

Exit mobile version