देशातील १० सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात बाजार मूल्यांकनात १ लाख ८१ हजार २०९.८९ कोटी रुपयांची भर घातली आहे. ज्यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर सर्वात आघाडीवर आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजार निर्देशांकात १ हजार ५७३.९१ अंकांनी वाढ झाली.
सेन्सेक्स यादीतील अव्वल १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फक्त मागे राहिले. परंतु हिंदुस्थान यूनिलिव्हर लिमिटेडने ५० हजार ०५८.०५ कोटी रुपयांची भर घातल्याने कंपनीचे बाजार भांडवल आता ५ लाख ८६ हजार ४२२.७४ कोटी रुपयांवर गेले आहे.
आयसीआयसीआय बँकेचे मूल्यांकन ३५ हजार ९५६.८ कोटी रुपयांनी वाढून ५ लाख २५ हजार ६५६.९६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य २३ हजार ९४०.१२ कोटी रुपयांनी वाढून ७ लाख ७५ हजार ८३२.१५ कोटी रुपये झाले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचे बाजारमूल्य १९ हजार ७९७.२४ कोटी रुपयांनी वाढून ४ लाख ४७ हजार ८४१.४६ कोटी रुपये झाले आहे.
हे ही वाचा:
नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींनी भव्य अशोक स्तंभाचे केले अनावरण
पहिल्या सहामाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात २.६ अब्ज कोटी गुंतवणुकीचा ओघ
पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी दिला इशारा
नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींनी भव्य अशोक स्तंभाचे केले अनावरण
स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल १९ हजार २३२.५५ कोटी रुपयांनी वाढून ४ लाख ३५ हजार ९२२.६६ कोटी रुपयांवर गेले आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल १५ हजार १२६.४ कोटी रुपयांनी वाढून ६ लाख ३७ हजार ३३.७८ कोटी रुपयांवर पोहचले आहे. भारती एअरटेलचे बाजार भांडवल १२ हजार ८ कोटी रुपयांनी वाढून ३ लाख ८१ हजार ८३३.२० कोटी रुपयांवर आणि एचडीएफसीचे बाजार भांडवल ५ हजार ९८.६५ कोटी रुपयांनी वाढून ४ लाख ६ हजार २१३.६१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर टीसीएसचे बाजार भांडवल १८ हजार ७७०.९३ कोटी रुपयांनी घसरून ११ लाख ९४ हजार ६२५.३९ कोटी रुपयांवर आले आहे.