31 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरअर्थजगत'या' सिलिंडरच्या दरात मोठी कपात

‘या’ सिलिंडरच्या दरात मोठी कपात

Google News Follow

Related

बुधवार,१ जून रोजी एलपीजी सिलेंडरची नवी किंमत जाहीर झाली आहे. या किमतीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. व्यवसायिक गॅस सिलेंडर आजपासून १३५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

नवीन किमतीनुसार, गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत २ हजार २१९ रुपये, कोलकात्यात २ हजार ३२२ रुपये, तर मुंबईत २ हजार १७१.५० रुपये आणि चेन्नईमध्ये २ हजार ३७३ रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

याआधीही गेल्या महिन्यात १९ तारखेला घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ३.५० रुपयांनी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याआधीही मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात एकदा वाढ करण्यात आली होती.

हे ही वाचा:

राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीचे समन्स

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’

राजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी एकाला अटक

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पहिल्या बारा घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली आहे. तसेच केंद्राने केंद्रीय उत्पादन शुल्क पेट्रोलवरील प्रति लिटर आठ रुपये आणि डिझेलवरील प्रति लिटर सहा रुपये कमी केला आहे. यामुळे पेट्रोल साडे नऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा