26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरअर्थजगतकोका- कोला 'थंड' का झाला? महसुलात झाली मोठी घट

कोका- कोला ‘थंड’ का झाला? महसुलात झाली मोठी घट

Google News Follow

Related

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन पुकारल्यामुळे त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. तसेच शीतपेये पिण्यापासून लोक परावृत्त होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शीतपेये निर्माता कोका- कोला इंडियाने २०२०- २१ च्या महसुलात वार्षिक १६ टक्क्यांची घसरण नोंदवली असून ती २,३३५ कोटी रुपयांवर आली आहे, तर कोविड- १९ महामारीच्या उद्रेकामुळे प्रभावित झालेल्या एका वर्षात तिचा निव्वळ नफा २८ टक्के घसरून ४४३ कोटी रुपयांवर आला आहे.

बिझनेस इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म टॉफलरने ऍक्सेस केलेल्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) मध्ये दाखल केल्यानुसार स्प्राईट आणि थम्स- अप सॉफ्ट ड्रिंक्स आणि किनले वॉटरच्या निर्मात्याने या आर्थिक वर्षात एकूण रु. १,७४१ कोटी खर्चाची नोंद केली आहे.

“एफएमसीजी (Fast-Moving Consumer Goods) इंडस्ट्रीमध्ये असल्याने, कंपनीवर निर्बंधांचा परिणाम होत आहे. कंपनीला विश्वास आहे की २०२१- २२ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांचा व्यवसाय पूर्ववत होईल,” असा विश्वास कोका-कोलाने आपल्या आर्थिक घोषणेमध्ये लिहिला आहे.

हे ही वाचा:

‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’

अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश

१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार

‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

हिन्दुस्तान कोका- कोला बेव्हरेजेस (HCCB) च्या बॉटलिंग आर्मने गेल्या आर्थिक वर्षात ७,००४ कोटी रुपयांच्या महसुलात २९ टक्के घसरण नोंदवली आहे. HCCB, जे ज्यूस आणि आइस- टी व्यतिरिक्त कोका- कोला सारखे शीतपेय बनवते आणि विकते. पुरवठा साखळीतील व्यत्यय, लॉकडाउन, रेस्टॉरंट्स, कॅफे, सिनेमागृहे बंद आणि कामगारांचे स्थलांतर यामुळे विस्कळीत झालेल्या निव्वळ नफ्यात त्यांनी वार्षिक ९३ टक्केची ७२ कोटी रुपयांची घसरण नोंदवली आहे. HCCB चा आर्थिक वर्षातील एकूण खर्च ६,९०२ कोटी रुपये होता.

शीतपेयांसाठीच्या उन्हाळी हंगामामध्ये सरकारने गेल्या मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन पुकारल्यामुळे पीक सीझनमध्ये शीतपेयांच्या विक्रीवर विपरित परिणाम झाला होता. कडक देशव्यापी लॉकडाऊन आणि त्यानंतरचे प्रवास, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफे, चित्रपटगृहे, शाळा आणि महाविद्यालये आणि मनोरंजन संकुलांवरील निर्बंध यामुळेही लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही मागणीवर त्याचा चांगलाच परिणाम झाला होता.

जून २०२१ मध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो हा त्याच्या पत्रकार परिषदेतील वर्तणुकीमुळे चर्चेत आला होता. पत्रकार परिषदेत टेबलावर कोका- कोलाची बाटली ठेवण्यात आली होती. तेव्हा त्याने कोका- कोलाची बाटली बाजूला केली आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या ऐवजी पाणी देण्यास सांगितले. रोनाल्डोने केलेल्या कृतीचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. रोनाल्डोचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोका- कोला कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. कोकचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले होते. त्याची किंमत २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलरवर आली होती. भारतीय रुपयात त्यांना २९ हजार ३०० कोटींचे नुकसान झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा