सीएनजीच्या वाढलेल्या किंमतींमुळे बसत असलेल्या झळांपासून सामान्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक माेठा निर्णय घेतला असून त्याचा येणाऱ्या काही दिवसात सकारात्मक परिणाम दिसू लागेल. तेल मंत्रालयाने स्थानिक नैसर्गिक वायूचा वापर करण्याचे आपले जुने धाेरण पुन्हा अंमलात आणण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार नैसर्गिक वायूंचे उत्पाद करणाऱ्या स्थानिक उद्याेगांच्या ऐवजी आता शहर वायू वितरण कंपन्यांना नैसर्गिक वायूच वितरण करण्यात येईल . त्यामुळ सीएनजी आणि पाईप गॅसच्या किंमती कमी हाेऊन सामान्यांना माेठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तीन महिने आधी सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांना वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीची मदत घ्या, असे सांगितले हाेते. पण त्यामुळे सीएनजी आणि पीएनजी वायूंच्या किंमती गगनाला भिडल्या हाेत्या. या दाेन्हींच्या किंमतीत जवळपास ७० टक्के वाढ झाली हाेती. त्यातच महागाई मुळे हा किंमतीचा भडका आणखी उडाला. स्थानिक उत्पादन केलेल्या नैसर्गिक वायूचा जास्त वाट्याचा पुरवठा इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, महागनर गॅस लिमिटेड या सारख्या वायू वितरण कंपन्यांना करावा असे देश तेल मंत्रालयाने दिले अाहेत.
ही वाचा:
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!
किंमतीवर नियंत्रण ठेवणे हाेणार साेपे
पूर्वी शहर गॅस वितरण कंपनीच्या एकूण मागणीपैकी ८३ ते ८४ टक्के मागणी देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूद्वारे पूर्ण केली जात होती. उर्वरित १६-१७ टक्के आयात करावी लागत हाेती. नुकत्याच झालेल्या निर्णयानंतर या गॅस कंपन्यांची ९४ टक्के मागणी पूर्ण होणार आहे. आता केवळ सहा टक्के आयात करावी लागणार असून त्यामुळे किमतीवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लि आणि महानगर गॅस लि यांना पूर्वी प्रती दिन १.७५ काेटी घनमीटर राखीव पुरवठा दिला जायचा अाता त्यात वाढ करून ताे प्रतिदिन २०.७८ घनमीटर करण्यात अाला अाहे.