23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतचित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना अटक

चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना अटक

Google News Follow

Related

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील (एनएसई) अनियमिततेच्या आरोपावरून सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांना अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आनंद सुब्रमण्यम हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. सुब्रमण्यम यांना चेन्नईतून सीबीआयने गुरुवारी अटक केली.

सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा आरोप सेबीने केला होता. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आनंद सुब्रमण्यम यांचीही चौकशी करत होती. ते तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत होते. सीबीआय अज्ञात योगी आणि चित्रा यांच्यात इमेलवर झालेल्या संभाषणाची अधिक माहिती घेत होती, पण आनंद त्याबद्दल नीट सांगत नव्हते.

हे ही वाचा : 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची लवकरच सुटका

श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

किशोरी पेडणेकरांनी दिले वेगळे वळण… म्हणतात, यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. घाबरणार नाहीत!

अमेरिका आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नाही!

एनएसईसह अनेक तज्ज्ञांच्या मते हा अज्ञात योगी म्हणजे आनंद हेच आहेत. एनएसई को-लोकेशन घोटाळ्यात निवडक ब्रोकर्सना फायदा करुन देण्यात आला होता. या सुविधेत उपस्थित ब्रोकर्सना बाकीच्यांपेक्षा लवकर सर्व माहिती मिळत होती. अशा प्रकारे एनएसईवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. चित्रा या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर आणि आनंद त्यांचा सहकारी बनल्यानंतर घोटाळा सुरूच होता. या प्रकरणात, सीबीआय त्या अज्ञात योगीचे कनेक्शन शोधत आहे, ज्याच्या इशार्‍यावर चित्रा या एनएसईचे सर्व निर्णय घेत होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा