‘चितळे एक्स्प्रेस’ची आता इथेही शाखा!

‘चितळे एक्स्प्रेस’ची आता इथेही शाखा!

चितळे उत्पादने उपलब्ध करणारे ‘चितळे एक्स्प्रेस’च्या दालनाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे.

गोरेगाव येथे नुकतेच चितळे एक्स्प्रेसच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. गोरेगावमधील हे दालन ‘चितळे एक्स्प्रेस’ या नावाने सुरू झालेल्या दुकानांच्या मालिकेतील २४ वे आणि मुंबईतील नववे दालन आहे. या दालनामध्ये एकाच छताखाली चितळे यांची सर्व उत्पादने उपलब्ध होणार आहेत. अभिनेत्री वंदना गुप्ते, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते गोरेगावमधील दालनाचे उद्घाटन पार पडले.

‘चितळे एक्स्प्रेस’ मध्ये दूध, दही, चीज, श्रीखंड, गुलाबजाम इन्स्टंट मिक्स, तूप, पनीर असे पदार्थ उपलब्ध आहेत. या पदार्थांसोबतच बाकरवडी, बर्फी, पेढे, काजू रोल, मोदक, पुरणपोळी तसेच विविध चवीच्या सोनपापडी, वेगवेगळ्या चवीचा चिवडा अशा सर्व पदार्थांची रेलचेल या दालनात असणार आहे. अशाच आणखी एका ‘चितळे एक्स्प्रेस’ दालनाचा मुंबईतील गोवंडी येथे शुभारंभ झाला. लवकरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अशी दालने सुरू होतील, असा मानस चितळे उद्योगसमुहाचे गिरीश चितळे आणि निखील चितळे यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

बांधवगडमधील हत्तींना १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी! काय आहे बातमी वाचा…

कोरोना काळात फुलविक्रेत्यांचे चेहरे कोमेजले!

शिवमंदिरात जाताना बांधकाम व्यावसायिकाला मारले ठार

जिओ धन धना धन! आणणार सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन

जानेवारी २०२१ मध्ये दादर येथे चितळे उद्योगसमूहाची पहिली मुंबईतील शाखा सुरू करण्यात आली होती. १९५० मध्ये रघुनाथराव चितळे यांनी ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली. मराठमोळ्या चवीची बाकरवडी करण्याचा प्रयोग १९७० च्या दशकामध्ये चितळे यांनी केला आणि गेली कित्येक वर्षे हा पदार्थ आपली वेगळी ओळख जपून आहे. या बाकरवडीने चितळेंना नावलौकिक मिळवून दिला. ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हा ब्रँड आता सातासमुद्रापार पोहचला असून त्यांनी त्यांचा व्यवसाय पुण्यातच मर्यादित न ठेवता इतर शहरात वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version