चीन चंद्रावर भाज्या पिकवू शकेल का? संशोधनातून काय निष्कर्ष निघाला?

चीन चंद्रावर भाज्या पिकवू शकेल का? संशोधनातून काय निष्कर्ष निघाला?

चॅंग इ-५ हे चीनचे अंतरिक्ष यान, चंद्रावरील मातीच्या नमुन्यासह सुरक्षितरित्या पृथ्वीवर उतरले. अवकाश संशोधन क्षेत्रात चार दशकांच्या अंतराने चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात आले. या कामगिरीमुळे चंद्रावर यशस्वी अवतरण करणारा चौथा देश म्हणून चीनची नोंद झाली आहे.

चीनच्या यानाने आणलेल्या मातीच्या परिक्षणातून चंद्रावर शेती करणे शक्य आहे की नाही याबाबत उलगडा होऊ शकेल. या नमुन्यांनुसार सध्या तरी चंद्रावर शेती करणे शक्य नसल्याचे दिसते. 

पृथ्वीवरील मातीच्या अगदी विरुध्द चंद्रावरील माती आहे. पृथ्वीवरच्या मातीत जैविक घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. याउलट चंद्रावरील मातीत जैविक घटक अजिबात सापडत नसल्याने तेथे शेती करणे शक्य नाही असे लक्षात आले आहे. जानेवारी २०१९ मध्ये चँग चंद्राच्या विरुध्द बाजूला यशस्वीरित्या उतरले. तिथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम शेतीचा अयशस्वी प्रयत्न झाला. आठवडाभराच्या अंतरात ती सर्व बीजे वाळून गेली.

चंद्रावर शेती सध्या जरी अशक्य दिसत असली तरी, नासा अवकाशात भाजीपाला पिकवत आहे. नासाने प्रायोगिक तत्त्वावर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकातील अंतराळवीरांसाठी भाजी उत्पादन चालू केले होते, त्याला यश आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाडांना पाणीपुरवठा, प्रकाशयोजना करून शेती करण्यात यश आले आहे.

Exit mobile version