वाढत्या कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था गडगडली आणि भारताला आली उभारी

सर्व जागतिक संघटनांनी चीनच्या विकास दराचे दावे फेटाळून लावले आहेत.

वाढत्या कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था गडगडली आणि भारताला आली उभारी

चीनमध्ये कोरोनाने उच्छाद मांडला. त्यामुळे या साथीने चीनमध्ये पुन्हा आपली पकड घट्ट केली आहे. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सर्व जागतिक संघटनांनी चीनच्या विकास दराचे दावे फेटाळून लावले आहेत.

जागतिक बँकेनेही विकासदराचा अंदाज कमी केला आहे. मंगळवारी जागतिक बँकेने याबाबतचा सुधारित अहवाल दिला आहे. त्यानुसार चीनचा विकास दरावर २.७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी जून २०२२ मध्ये बँकेने चीनचा विकास दर ४.३ टक्के नोंदवला होता. हा अंदाज ८.१ टक्क्यांवरून ४.३ टक्क्यांवर आला आहे.

तर दुसऱ्या बाजूला भारताच्या विकास दराचा अंदाज सुधारित आणि वाढवला जात आहे. जागतिक कंपन्या आता भारताकडे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहत आहेत आणि अनेक ब्रँड उत्पादन सुरू करण्यास उत्सुक आहेत. जागतिक रेटिंग एजन्सी भारताच्या विकास दराबाबत आशावादी आहेत. या संस्थांनी भारताच्या विकासाबाबत समाधान व्यक्त केले आहे. काही संस्थांनी संशोधन करून भारताचा विकास दर ७ टक्के राहील, असे भाकीत केले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करून त्यांचे उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत आहेत.

हे ही वाचा:

सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर

कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?

९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश

साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’

सध्या जगभरातील कोरोनाची नवीन आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे ३६ लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. परिणामी १० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पुढील ९० दिवसांत चीनच्या ६० टक्के लोकसंख्येला आणि जगातील १० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version