केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आता पुन्हा सुरू झाला असून त्यात वाढही करण्यात आली आहे. बुधवार, १४ जुलै रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. देशातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत निर्णय घेण्यात आले असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. प्रतिवर्षी दोन वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. सहा महिन्याच्या अंतराने हा भत्ता दिला जातो. पहिला हफ्ता १ जानेवारीला तर दुसरा हफ्ता १ जुलै रोजी देण्यात येतो. पण गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे हफ्ते दिले नव्हते. तर १ जानेवारी २०२१ ला सुद्धा हा हफ्ता दिला गेला नव्हता.

हे ही वाचा:

जनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर

‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख

काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…

पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महागाई भत्त्यावरिल स्थगिती सरकारने मागे घेतली आहे. तर यापुढे तीन हफ्ते मिळून एकूण ११% इतकी महागाई भत्त्यात वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे महागाई भत्त्याचा दर १७ टक्‍क्‍यांहून वाढवून २८ टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांनाही फायदा होणार आहे.

Exit mobile version