सीबीआयने ५३८ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये जेट एअरवेजचे माजी प्रवर्तक नरेश गोयल यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजच्या अनेक माजी संचालकांसह इतर अनेक आरोपींवर छापे टाकण्यात येत आहेत.
दिल्ली आणि मुंबईतील जेट एअरवेजच्या जागेवर, एअरवेजचे माजी अधिकारी आणि गोयल यांच्या जागेवर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. बँकेच्या फसवणुकीबाबत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार हे छापे टाकण्यात आले आहेत.
या छाप्यात सीबीआयने नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यासह माजी विमान संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयांवर छापे टाकले. जेट एअरवेजने कॅनरा बँकेकडून सुमारे ५३८ कोटींचे कर्ज घेतले होते. याबाबत काही सरकारी कर्मचाऱ्यांसह इतरांवरही कारवाई होऊ शकते.
हे ही वाचा:
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं
दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले
जेट एअरवेज ही एकेकाळी देशातील सर्वात मोठी खाजगीविमान कंपनी होती. परंतु एअरवेजने एप्रिल २०१९ मध्ये रोखीच्या तुटवड्याचे कारण देऊन त्यांचे कामकाज थांबवले.सीबीआयने नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि माजी विमान कंपनीचे संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून ५३८ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीचा नवीन गुन्हा नोंदवला असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत जालान कॅलरॉक कन्सोर्टियमने जेट एअरवेजसाठी बोली जिंकली.